Ad will apear here
Next
कस्तुरी प्रतिष्ठानतर्फे १५ ऑगस्टला विविध कार्यक्रम
हवेली (पुणे) : उरूळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सकाळी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये शुगर तपासणी, रक्तदाब, दातांची तपासणी, स्त्री रोग आणि बालरोग तपासणीचा समावेश आहे. तसेच हडपसर येथील एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र चिकित्सा (मोतीबिंदू) तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. दरम्यानच्या कालावधीत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

याचबरोबर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मेंदी स्पर्धा, मुलांसाठी ‘पर्यावरणातील बदल’, ‘स्वच्छ भारतातील माझे योगदान’ या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. ‘ग्रामस्वच्छता अभियान’, ‘वृक्षारोपण’ या विषयांवर चित्रकला स्पर्धा आणि ‘स्वच्छतेचे महत्त्व’, ‘निसर्ग आणि माणूस’, ‘मुलगी वाचवा’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. सायंकाळच्या सत्रात संगीत खुर्ची आणि नृत्य स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यातील विजेत्यांना प्रतिष्ठानतर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, उपाध्यक्ष संतोष भन्साळी, सचिव शंकर पाटील, खजिनदार वैजनाथ कदम यांनी केले आहे. या कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे सदस्य घनःश्याम मेमाणे, महादेव रेवडकर, हृषीकेश जगताप, महेश कुंकुलोळ, कौस्तुभ मेमाणे, रामदास दौंडकर, बाबाजी तांबोळी, हरी पुरुषवाणी हे मेहनत घेत आहेत.

दिवस :
मंगळवार, १५ ऑगस्ट
आरोग्य, नेत्र तपासणी शिबिर : सकाळी नऊ वाजता.

रक्तदान शिबिर
स्थळ : अक्षय ब्लड बँक, हडपसर
वेळ : सकाळी आठ ते सायंकाळी चार

स्पर्धांविषयी
रांगोळी, मेंदी स्पर्धा : सकाळी ११ ते दुपारी दोन
निबंध स्पर्धा : दुपारी एक वाजता
संगीत खुर्ची : दुपारी ३.३० वाजता
नृत्य स्पर्धा : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : कस्तुरी लॉन्स मंगल कार्यालय, उरूळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे

नावनोंदणीसाठी संपर्क :
आशिष : ८८८८० ८५९५९
उमेश : ९७६४८ ०४५४५
संदीप : ९९६०३ १५८१५
अभिषेक : ९८६०० ५२५२०
संदीप : ९०११० १८०९७
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZOJBF
Similar Posts
कस्तुरी प्रतिष्ठानच्या स्पर्धा, शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : कस्तुरी प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य शिबिर, हडपसर अक्षय ब्लड बँकेच्या साह्याने रक्तदान शिबिर, तर एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या साह्याने डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले होते
स्वातंत्र्यदिनानिमित्त हडपसरमध्ये विविध कार्यक्रम स्वातंत्र्यदिनानिमित्त हडपसर येथे झालेल्या विविध कार्यक्रमात नगरसेवक मारुती तुपे यांनी भाग घेतला. महापालिकेच्या शाळांमध्ये स्थायी समितीचे सदस्य असलेल्या तुपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, पुणे मनपा शिक्षण विभाग कर्मचारी मंडळाचे अध्यक्ष गोरख तुपे, तसेच
काचबिंदूमुळे होणारे अंधत्व रोखण्यासाठी नियमित तपासणी आवश्यक पुणे : ‘काचबिंदूवर वेळीच उपचार न केल्यास अंधत्वाची जोखीम निर्माण होऊ शकते आणि म्हणून आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे,’ असे मत एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील काचबिंदू सल्लागार डॉ. विद्या चेलेरकर यांनी व्यक्त केले.
‘योग्य सावधगिरीमुळे उन्हाळ्यात नेत्र रोगांपासून बचाव शक्य’ पुणे : कडक ऊन आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान यांचा डोळ्यांवर प्रभाव पडण्याची शक्यता असते. असे असले तरी सर्वांनी सावधगिरी बाळगल्यास उन्हाच्या तडाख्यापासून स्वत:च्या डोळ्यांचा बचाव करणे सहज शक्य असल्याची माहिती एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या कॉर्निया व कॅटरॅक्ट कन्सल्टंट डॉ. सीमा जगदाळे यांनी दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language